महत्त्वाच्या घटना
१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनले.
१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.
१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे(CSIR)महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर
आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT)डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
२००१: समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्या व्यक्तींना देण्यात येणारा
राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.
२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.
जन्मदिवस / वाढदिवस
१७०४: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर . (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
१८००: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर . (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
१८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर . (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
१८८०: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद –हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)
१८८६: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे . (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
१९०२: केशवा तथा के. शंकर पिल्ले –व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,
पद्मविभूषण (१९७६), चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम यांचे संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी . (मृत्यू: २९ जून १९६६)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन . (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर . (मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी . (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
१९४१: गुजरातचे ८वे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी . (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज .
१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान. (मृत्यू: १५ जून २०१३)
१९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग .
१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव .
मृत्यू / पुण्यतिथी