महत्त्वाच्या घटना
१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.
१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.
१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत,
एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
जन्मदिवस / वाढदिवस
१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल . (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)
१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड . (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)
१८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे सहसंस्थापक अलीशा ग्रे . (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)
१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे –भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स
ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना मास्टर ऑफ नायट्रेटस म्हणत. (मृत्यू: १६ जून १९४४)
१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या . (मृत्यू: ४ जुलै १९६३)
१८७७: भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५)
१८९२: वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर . (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८)
१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे . (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)
१९१८: आध्यात्मिक गुरू जे. पी. वासवानी.आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य
१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला. (मृत्यू: ११ जुन २०१३)
१९३२: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट. (मृत्यू: १३ डिसेंबर २०१६)
१९४१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन .
१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय .
१९५८: भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब .
मृत्यू / पुण्यतिथी
१५८९: फ्रान्सचा राजा हेन्री (तिसरा) . (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)
१७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील.
१९२२: टेलिफोनचे संशोधक स्कॉटिश –अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल. (जन्म: ३ मार्च १८४७)
१९३४: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग . (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)
१९७८: मोनॅको ग्रांप्रीचे स्थापक अॅन्टोनी नोगेस . (जन्म: १३ सप्टेंबर १८९०)