जन्मदिवस / वाढदिवस
१०७८: जपानी सम्राट होरिकावा. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)
१८७९: अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)
१९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)
१९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर –कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४)
१९१२: चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर. (मृत्यू: ३१ मार्च २००४)
१९२५: डॉ. वि. ग. भिडे –शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ – १९७५), पद्मश्री
१९२६ : शंकर पाटील –साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव
आणि बालभारतीचे संपादक. त्यांचे चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे कथासंग्रह तसेच सरपंच, इशारा, घुंगरू,
कुलवंती, बेईमान, ललाट रेषा, सुन माझी सावित्री या कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे. (मृत्यू: ३० जुलै १९९४)
१९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके. (मृत्यू: १४ मार्च १९९८)
१९३४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी. (मृत्यू: १२ मे २०१४)
१९४०: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई . (मृत्यू: २ जुलै २००७)
१९५०: प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी .
१९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव.
१९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला.
१९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर .
मृत्यू / पुण्यतिथी