१६६०: मुघल फौजांनी संग्रामगड चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८६२ : कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
२०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
२०१४: पाकिस्तानातील तहरीके इंसाफ़ चे प्रमुख इमरान ख़ान यांच्या नेतृत्वाखाली लाहौर आणि इस्लामाबाद मधे आज़ादी मार्च काढण्यात आला.
२०१७: बिहार मधे आलेल्या पुरात ४०० हून अधीक लोकांचा मृत्यू
१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट . (जन्म: १९ मार्च १९००)
१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव. (जन्म: १५ जानेवारी १९२६)
१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी . (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)
२०११: हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर . (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)
२०१२: महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री विलासराव देशमुख. (जन्म: २६ मे १९४५)