जागतिक पोस्ट दिन
महत्त्वाच्या घटना
१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
२०१४: फ़्रांसचे लेखक पैत्रिक मोदियानो यांना साहित्याचे नोबेल.
जन्मदिवस / वाढदिवस
१७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) . (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)
१८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ
एमिल फिशर . (मृत्यू: १५ जुलै १९१९)
१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी. (मृत्यू: ४ जून १९४७)
१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा
उत्कलमणी. (मृत्यू: १७ जून १९२८)
१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)
१९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर. (मृत्यू: २० डिसेंबर २००१)
१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)
१९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन.
१९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड.
मृत्यू / पुण्यतिथी
१८९२: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’–पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात प्रभाकर
या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले.
लक्ष्मीज्ञान हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)
१९१४: विनायक कोंडदेव ओक –बालवाङ्मयकार. मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ.
लेखन केले. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)
१९५५: गोविंदराव टेंबे –हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,
संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. अयोध्येचा राजा, अग्निकंकण, मायामच्छिंद्र हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ५ जून १८८१)
१९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ . (जन्म: २४ जून १९०८)
१९९८: जयवंत पाठारे –आह, अनाडी, अनुराधा, छाया, सत्यकाम, आनंद, अभिमान, गोलमाल यांसारख्या गाजलेल्या
चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)
१९९९: मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर –नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खूष होऊन त्यांना नूतन पेंढारकर हे नाव प्रदान केले.
२०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस . (जन्म: १ जानेवारी १९१८)
२००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम . (जन्म: १५ मार्च १९३४)
२०१४: माधव विट्ठल कामत (आयु ९३ वर्ष) भारतीय पत्रकार ( जन्म: ७ सप्टेंबर, १९२१ )
२०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)
२०१८: थॉमस स्टीज़ ,अमेरिकी रसायन वैज्ञानीक, नोबेल पुरस्कार विजेते.