शिंगाडयाची शेव

साहित्य:-

शिंगाडयाचे पीठ 2 वाटया
मीठ, तिखट चवीनुसार
शेंगदाण्याचे तेल तळायला

कृती:-

शिंगाडयाचे पीठ, मीठ एकत्र करुन त्यात दोन चमचे तेल घालावे. नंतर कोमट पाण्याने भिजवून दहा मिनिटे ठेवावे. पुन्हा चांगले मळून शेवेच्या साच्यातून शेव काढावी.

साबुदाण्याची शेव

साहित्य:-

बारीक साबुदाणा (0 नंबर) 1 वाटी
उकडलेला बटाटा अर्धी वाटी
तिखट, मीठ चवीनुसार
साखर, आमचूर पावडर चवीनुसार
शिंगाडयाचे पीठ 2 चमचे

कृती:-

साबुदाणा 4-5 तास भिजवून रवीने घोटून घ्यावा. नंतर यात बटाटा, शिंगाडयाचे पीठ, तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर इत्यादी घालून गोळा मळावा. नंतर जाड शेवेच्या साहाय्याने शेव पाडावी व तळून घ्यावी. ही शेव बरेच दिवस टिकू शकते.

 साबुदाण्याची चकली

साहित्य:-

साबुदाणा पाव किलो
उकडलेला बटाटा 100 ग्रॅम
मीठ चवीनुसार
जीरे 1 चमचा
आमचूर पावडर अर्धा चमचा

कोथिंबीर –

कृती:-

साबुदाणा 4 तास भिजवून त्याला व्यवस्थीत रवीने घोटून घ्यावे. पाण्याचे प्रमाण जास्त नको. नंतर यात बटाटा मिसळून या मिश्रणाचा गोळा तयार करावा. नंतर यात चवीनुसार मीठ, जीरे, आमचूर पावडर घालून याच्या चकल्या पाडून वाळवून घ्याव्यात.

टीप:- हे सर्व तयार करतांना तेलाचा वापर टाळावा. कारण याची आपण साठवण करतो त्यामुळे यात जर तेलाचा वापर केला तर त्याला वास लागू शकतो.

साबुदाणा पुरी

साहित्य:-

साबुदाणा पीठ पाव किलो
उकडलेला बटाटा 1-2 नग
मीठ चवीनुसार
तिखट अर्धा चमचा

कृती:-

साबुदाणा पीठात उकडलेला बटाटा कुस्करुन मिश्रण एकजीव करा व त्यात चवीनुसार मीठ व तिखट घाला. नंतर एका प्लास्टीकवर गोळा ठेवून वरुन दुसरे प्लास्टीक घाला आणि त्याच्या पु-या लाटून घ्या. सव्र्ह करतेवेळी बटाटयाच्या भाजी बरोबर सर्व्ह करा.

 साबुदाणा पकोडे

साहित्य –

भिजलेला साबुदाणा 1 वाटी
जीरे 1 चमचा
हिरवी मिरची 2 चमचे
कोथिंबीर 2 चमचे
मीठ चवीनुसार

कृती –

थोडे गरम पाणी करुन त्यामध्ये साबुदाणा घालून वाफवून घ्या. नंतर त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व जीरे घालून मिश्रण थंड करा. नंतर त्याचे पकोडे तेलात तळून घ्या.

उपवास भाजणीचे वडे

साहित्य –

उपवासाची भाजणी 3 वाटया
उकडलेला बटाटा 1 नग
दाण्याचा कुट अर्धी वाटी
लिंबू 1 नग
मीठ, साखर चवीनुसार
दही अर्धी वाटी

कृती –

उपवासाच्या भाजणीत साधारण तीन वाटया भाजणीला एक उकडलेला बटाटा, जीरं, हिरवी मिरची, अर्धी वाटी दाण्याचा कुट, लिंबू, मीठ, साखर घालून चवीनुसार दही घाला. हातावर वडे थापून तळून घ्या किंवा शेलोफ्राय करा. दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खायला दया.

बटाटयाचा किस

साहित्य –

बटाटे 2 नग
तूप 4 चमचे
जीरे अर्धा चमचा
हिरवी मिरची 2-3 नग
मीठ, साखर चवीनुसार
दाण्याचा कुट 1 वाटी
काजू, किसमीस पाव वाटी
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

कच्चा बटाटा धुवून त्याचा किस पाडून घ्या. एका पातेल्यात थोडेसे तूप घेवून गरम झाल्यावर त्यात जिरे, हिरवी मिरची फोडणीला घालून बटाटयाचा किस घाला. चांगले परतून त्यात चवीनुसार मीठ, साखर घाला. सर्व एकत्र करुन यामधे थोडे जाडसर दाण्याचे कुट वाटल्यास काजू, किसमीस, मीठ, लिंबू, साखर व कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

उपवासाची इडली

साहित्य –

व-याचे तांदूळ 2 वाटया
साबुदाणा पीठ 2 वाटया
दही अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
इनो 1 पॅकेट
दाण्याचा कुट अर्धी वाटी
घट्ट दही 1 वाटी
हिरवी मिरची 2-3
जीरे अर्धा चमचा
कोथिंबीर 2 चमचे

कृती

– यासाठी 2 वाटया व-याचे तांदूळ (भगर) 2 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर यात 2 वाटया साबुदाण्याचे पीठ, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ व 1 इनो पॅकेट घालून एकत्र करा. लगेच इडली पात्रात घालून इडल्या तयार करा. दाण्याच्या चटणी बरोबर खायला दया. दाण्याच्या चटणी करीता 1 वाटी मलाईचे घट्ट घोटलेले दही त्यामध्ये अर्धी वाटी दाण्याच कुट, चवीनुसार मीठ, साखर घालून वर हिरवी मिरची, जीरं व कोथिंबीरीची फोडणी दया.

उपवासाचा दोसा

साहित्य –

व-याचे तांदूळ 2 वाटया
साबुदाणा पीठ दीड वाटी
शिंगाडा पीठ अर्धी वाटी
आरारोट अर्धा चमचा

कृती –

2 वाटी व-याचे तांदूळ (भगर) भिजवून वाटून घ्या. वाटतांना यामध्ये दीड वाटी साबुदाणा पीठ, अर्धी वाटी शिंगाडा पीठ घालून 7-8 तास भिजवून ठेवा. दुस-या दिवशी याला व्यवस्थित घोटून नेहमीच्या दोस्यासारखे दोसे बनवून घ्या. दोसे मऊ पडत असल्यास थोडा आरारोट घालावा.

केळाचे चाट

साहित्य –

कच्ची केळी 2 नग
हळद 1 चमचा
उकडलेला बटाटा 1 नग
घट्ट दही अर्धी वाटी
लिंबाचा रस 2 चमचे
साखर, तिखट, मीठ चवीनुसार
शिंगाडयाची शेव अर्धी वाटी
अनारदाणे अर्धी वाटी
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

2 कच्च्या केळाचे लांब-लांब चिप्स काढून 2 मिनिटे हळदीच्या पाण्यात ठेवावे. नंतर बाहेर काढून त्यावर 1 उकडलेला बटाटा, अर्धी वाटी घट्ट दही, 2 चमचे लिंबाची चटणी (लिंबाचा रस, साखर, तिखट, मीठ एकत्र करुन घेण), अर्धी वाटी शिंगाडयाची शेव, अर्धी वाटी अनारदाणे, मीठ, साखर, कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.

बटाटयाचा शिरा

साहित्य –

उकडलेले बटाटे 3 नग
तूप 1 वाटी
साखर दीड वाटी
काजू-बदाम 4 चमचे
पिस्ते 2 चमचे
मीठ चवीनुसार

कृती –

तूपामध्ये सुका मेवा परतून बाजूला ठेवा. नंतर यात कुस्करलेला बटाटा सोनेरी रंगावर परतून घ्या. त्यात साखर, चिमूटभर मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्या. वरुन काजू-बदाम-पिस्ते काप घालून खायला दया.