वधुसाठी उखाणे –
लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
—रावांना घास देताना,मला येई गोड हसू .
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
—राव म्हाजे माझ्या जीवनसाथी .
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
–रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.
आकाशाच्या अंगणात ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,
–रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .
गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
–चे नाव माझ्या ओठी यावे .
आनंदाने भरला ,दिन हा लग्नाचा ,
–ना घास देते ,गोड जिलेबीचा .
मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती,
–चे नाव घेऊन समाधान चित्ती .
स्वाती नक्षत्रातील थेंबाने शिंपल्यात होते मोती ,
–च्या संगतीत उजळते जीवनज्योती .
चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला ,
–रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला .
मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,
–रावांचे आयुष्य वाढो हीच प्रार्थना तुला.
कुरुंदाची सहन चंदनाचे खोड
–रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .
चांदीची फटफटी सोन्याची सीट ,
नवरा म्हणे बायकोला जाऊ आपण डबलसीट .
सुख समृद्धी ,समाधान आणि संस्काराची शालीनता,
–च्या संगतीमध्ये जीवनात येईल तृप्तता .
बकुळीचा बकुलगंध , मृतात्कींचा मृदगंध ,
–ची जीवनसाथ हा रेशमी ऋणानुबंध .
मंगळसुत्रातल्या दोन वाट्या सासर आणि माहेर,
–रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .
सासरची सर्वा माणस आहेत हौशी ,
–रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
–चे नाव घेण्यास आजच केली सुरवात
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
–चे नाव घेते राखते तुमचा मान
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
–नाव घेते सोडा माझी वाट
श्रावणात पडतात सरीवर सरी
–रावांच नाव घेताना मी होते बावरी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि —-
–रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
–चं नाव घ्यायचा मला नाही आळस
देवघरात तेवतो नंदादिप समाधानाचा
–च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा
अंबाबाई च्या देवळात हळदी – कुंकुवाच्या राशी
–रावांच नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
लग्न झालेच नाही तर नाव कसे घेऊ.
वरासाठी उखाणे –
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार___सारखा हिरा
एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!
गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा
लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !
एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ
निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …
__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल
काही शब्द येतात ओठातून,
__चं नाव येतं मात्र हृदयातून.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
__ला भरवितो जिलेबीचा घास.
भाजीत भाजी मेथीची,
__माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे साजुक,
__आहेत आमच्या फार नाजुक.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
__मला मिळाली आहे अनुरूप.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
__चे नाव घेतो सर्वजण ऐका.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
__झाली आज माझी गृहमंत्री.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ __सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
__चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
__चे बरोबर बांधली जीवन गाठ.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
__च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
__चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
__चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
__माझी सर्वांपेक्षा सुंदर.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
__चे नाव घेतो __च्या घरात.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
__चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
__चे नाव घेऊन सोडतो कंकण.