भाताचे प्रकार
साधा भात
मेतकूट भात
साहित्य:-
फुटाण्याची डाळ अर्धी वाटी
हळद पाव चमचा
मेथीदाणे पाव चमचा
धने पाव चमचा
जीरे पाव चमचा
हिंग पाव चमचा
तयार भात 2 वाटया
फ्रेश क्रीम पाव वाटी
तूप 2 चमचे
कृती:-
सर्व प्रथम मेथीदाणे, फुटाण्याची डाळ, धने, जीरे, हिंग, हळद एकत्र करुन भाजून त्याची पुड करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घाला. एका पातेल्यात तूप गरम करुन त्यात तयार भात व तयार केलेली पुड घालून एकत्र मिसळून घ्या. थोडे गरम झाल्यावर फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकत्र मिसळून घ्या. तयार भाताची मूद पाडून त्यावर पुदीन्याचे पान ठेवून सर्व्ह करा.
हात फोडणीचा भात
साहित्य:-
तयार भात 1 वाटी
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
बारीक चिरलेली मिरची 2 चमचे
लसूण बारीक चिरलेला 2 चमचे
मीठ 1 चमचा
लिंबू 1 नग
साखर चवीनुसार
कोथिंबीर –
साईचं दही 1 वाटी
कृती:-
साधा भात थोडया पाण्याच्या हातानी मोकळा करुन घ्या. 2 चमचे तेलात मोहरी, लसूण, मिरची, हिंग, हळद घालून ही फोडणी भातावर घालून मीठ, साखर, लिंबू घालून वरुन कोथिंबीर घालून छान कालवून घ्या, दह्याबरोबर खायला द्या.
मुगाची खिचडी
साहित्य:-
मुगाची डाळ (सालासकट) 1 वाटी
चणा डाळ पाव वाटी
तांदूळाची चुरी 2 वाटया
गूळ 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
मीठ चिमूटभर
तूप 4 चमचे
कृती:-
एक वाटी मुगाची सालाची डाळ, पाव वाटी चणा डाळ भिजवून ठेवा. त्याच्या दुप्पट वासाच्या तांदूळाची चुरी घ्या. या मिश्रणाच्या दुप्पट पाण्यात प्रथम डाळ शिजवून घ्या. डाळ 70 टक्के शिजल्यावर त्यामध्ये तांदूळ, थोडा गूळ, हिंग, हळद, मीठ घालून परत एकत्र शिजवा. नंतर शिजवतांना मात्र सतत ढवळत राहा. त्यामूळे खिचडी भांडयाला लागणार नाही. गरम तूपाबरोबर सव्र्ह करा.
टीप:- काही वेळानंतर ही खिचडी घट्ट होते. अशा वेळी थोडे गरम पाणी यामध्ये घाला.
गोळा भात
साहित्यः-
चिन्नोर तांदूळ 2 वाटया
बेसन 1 वाटी
धणेजीरे पावडर 2 चमचे
तिखट, हळद, हिंग, मोहरी फोडणीकरीता
कढीपत्ता फोडणीकरीता
तेल पाव वाटी
कृती गोळयांसाठी:-
प्रथम बेसनात हळद, तिखट, चवीनुसार मीठ, धणे, जीरे पावडर, घालून एकत्र मिसळून घ्या. तेलाचे भरपूर मोहन घालून गोळा होईल इतपत भिजवा हाताच्या मुठीच्या आकाराचे गोळे बनवा आपण नेहमीप्रमाणे जसा भात शिजवतो तसा शिजवा, शिजवायला त्यात थोडी हळद, मिठ घाला. भात अर्धवट शिजत आला की त्यात वरील तयार केलेले गोळे घालून मंद आचेवर शिजवा. वरुन मोहरी जिरे-कढीपत्ता, हिंगाची फोडणी घाला व चिंचेच्या कढीबरोबर खायला द्या.
टीप:- भात वाढताना गोळयांबरोबर वाढा व वरुन फोडणी घाला जास्त चवीष्ट लागते
वडा भात
साहित्य:-
मूग डाळ अर्धी वाटी
उडद डाळ अर्धी वाटी
चणा डाळ अर्धी वाटी
मटकी पाव वाटी
चवळी अर्धी वाटी
तयार भात 3 वाटया
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
लसूण 1 चमचा
हिरवी मिरची 5-6
कोथिंबीर –
अख्खे धने 2 चमचे
जीरे 2 चमचे
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
हिंग पाव चमचा
मोहरी 1 चमचा
कृती:-
मूग, उडद, चणा, मटकी, चवळी 2 वाटी समप्रमाणात डाळी घेवून, भिजवून वाटून घ्या. वाटतांना यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे अख्खे धने, 1 चमचा जीरं घाला. नंतर या मिश्रणामध्ये चवीनुस हळद, तिखट, मीठ, घालून वडे थापून तळून घ्या. नंतर हे तयार वडे तयार केलेल्या साध्या भातात कुस्करुन एकत्र करा. त्यावर हिंग, मोहरी व जी-याची फोडणी घाला. कढीबरोबर खायला दया.
दही भात
साहित्य:-
तयार भात 2 वाटया
मलाईचे दही 1 चमचा
दूध 2 वाटया
मीठ, साखर चवीनुसार
कृती:-
सर्व प्रथम 2 वाटया भात शिजवून घ्या. त्यामध्ये 1 चमचा मलाईचे दही, 2 वाटया कोमट दूध, मीठ साखर घालून हे मिश्रण एका भांडयात ठेवून उबदार जागेत ठेवा. तीन-चार तासानी भात खायला दया.
मसाले भात
साहित्य –
तांदूळ 3 वाटया
सोललेला बटाटा 1 वाटी
फ्लाॅवरचे तुकडे 1 वाटी
शहाजीरे अर्धा चमचा
आलं-लसूण 1-1 चमचा
दही अर्धी वाटी
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
हळद अर्धा चमचा
तिखट चवीनुसार
खडा मसाला 1 चमचा
कोथिंबीर पाव वाटी
मीठ चवीनुसार
काळा मसाला 1 चमचा
साजूक तूप 2 चमचे
ओलं खोबरं 4 चमचे
कृती –
सर्व प्रथम एक वाटी सोललेला बटाटा, एक वाटी फ्लाॅवर तेलात तळून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेवून त्यामध्ये शहाजीरे, आलं, लसूण, दही, धणे-जीरे पावडर, हळद, तिखट, थोडा खडा मसाला, बारीक चिरलेला कोथिंबीर व तळलेले बटाटे, फ्लाॅवर टाका. दुसÚया एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यामध्ये थोडं मीठ व धुतलेला तांदूळ शिजत ठेवा. त्याचबरोबर फ्लाॅवर बटाटयाचा मसाला व काळा मसाला पण घाला. त्यावर 2 चमचे साजूक तूप घालून मंद आचेवर भात शिजवा. वरुन ओलं खोबरं, कोथिंबीर घालून खायला दया.
भरडा भात
साहित्य:-
शिजवलेला भात 2 वाटया
जाडसर वाटलेला चण्याच्या डाळीचा भरडा 1 वाटी
जिरे पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
तिखट, हिंग, मोहरी, तेल, कढीपत्ता चवीनुसार
कृती:- प्रथम थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, धणे जीरे पावडर, हळद, तिखट इ. घालून डाळीचा भरडा घालून खरपूस भाज्या त्या नंतर यात मीठ जरुरीपूरते गरम पाणी घालून वाफ येऊ द्या. शिजवल्यावर हा भरडा भाताबरेाबर कालवून खायच्या वेळी असा हा कालवलेला भात. त्यावर हिंगाचे पाणी वरुन मोहरी-लसणाची फोडणी घालून कढीबरोबर मसाल्याच्या मिरचीबरोबर खायला द्या.
भातावरच पिठलं
साहित्य:-
तांदूळ 2 वाटया
बेसन 1 वाटी
दही अर्धी वाटी
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
जीरे 1 चमचा
कोथिंबीर –
मीठ चवीनुसार
कृती:-
सर्व प्रथम कुळीथ, दही, मीठ एकत्र करुन चांगले घाटून घ्या. नंतर थोडे मीठ घालून भात शिजवून घ्या. 80 टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये तयार केलेले बेसनाचे मिश्रण घालून भात मंद आचेवर पूर्णपणे शिजवा. तोपर्यंत हिंग, मोहरी, हळद, जीरे, कोथिंबीर याची फोडणी घालून ठेवा. सर्व्ह करतेवेळी त्यावर फोडणी घालून भात सर्व्ह करा. बरोबर सांडगा किंवा मिरची दया.