• तिथी :

भाद्रपद शुद्ध पंचमी

  • पार्श्वभूमी :

ऋषी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ऋषींच्या दिनचर्येप्रमाणे एक दिवस अनुभवणे या भावनेने हा सण साजरा केला जातो.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. महिला उपवास धरतात. ऋषी स्थानी जावून स्नान करून ऋषी पुजन करतात.  बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत, तसेच गाईचे दूध पीत नाहीत.   ऋषी प्रमाणे आपल्या परसबागेत भाजी पाला, फळ झाडे लावून त्या भाज्या व फळे खातात.असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात.

  • वैशिष्ट्य :

या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे.

  • खाद्यपदार्थ :

ऋषिपंचमीची भाजी

.